विविध तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, 2 आठवड्यात निवडणुका घेण्याचे आदेश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण मिळणार याबद्दलची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पार पडली. यावेळी न्यायालयाने राज्य सरकारला मोठा निर्णय दिला आहे. बांठिया आयोग शिफारसी बाबत मागासवर्ग आयोगाने निर्णय घ्यावा आणि 2 आठवड्यात निवडणुका घ्या, असे आदेश दिले आहे.
या सर्व निर्णयाचे आम्ही सर्व ओबीसी संघटना स्वागत करतोय, त्याच पद्धतीने आम्ही राज्य सरकारला जातनिहाय जनगणना करून ओबीसीची आकडेवारी जाहीर करावी अशी मागणी असून आवाहन करण्यात आहे.
या वेळी राजूभाऊ तुराणकर, आनंद नक्षणे, संजय गाथाडे, अविनाश चिंचोलकर, ललित लांजेवार, राहुल झट्ठे, निखिल तुराणकर, सर्व ओबिसी बांधव उपस्थित होते.