त्वरित पंचनामे करून पूर पीडित, नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या - युवक काँग्रेस ची मागणी

योगेश मडावी | सह्याद्री चौफेर 

झरी : गेल्या पंधरादिवसापासून अनेक भागात संततधार पाऊस पडला असून अतिवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी पुरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर काहीच्या घरात पाणी शिरले,तर वाहतुकीच्या पुलामध्ये पुराड अडकून रस्त्याचे पापडे निघाले असून अनेक ठिकाणी अतोनात नुकसान झाल्यामुळे युवा काँग्रेस वणी विधानसभा झरीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात ओला दुष्काळ जाहीर करावा व पुरामुळे जे नुकसान झाले आहे त्यांना पंचनामे करून मदत, शेतकरी यांना नुकसान भरपाई देण्यात यावे. निवेदनाचा विचार न केल्यास युवा काँग्रेस झरी कार्यकर्त्यांच्या वतीने "रास्ता रोको आंदोलन" करण्यात येईल असा ईशारा निवेदनाच्या माध्यमांतून दिला आहे.
यावेळी राहुल दांडेकर वणी विधानसभा युवा काँग्रेस झरी, संदीप बुरेवार सभापती कृ. उ.बा.स झरी, निलेश येलटीवार सरपंच संघटना अध्यक्ष झरी, हरिदास गुर्जलवार, प्रतीक गंडतवार, अनिल इनमूलवार शेतकरी, राजू विधाते, समीर आत्राम, आसिफ कुरेशी, निखिल चौधरी, श्रीकांत अनमूलवार, आदी उपस्थित होते.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();