टॉप बातम्या

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विना पंचनामा सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी

नंदकुमार मस्के | सह्याद्री चौफेर 

महागांव : मागील आठवड्या भरापासून जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक विवांचनामध्ये सापडलेला आहे.

मागील तीन वर्षापासून शेतकऱ्यांना आसमानी व सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. नदी नाले तुडुंब भरून वाहत गेले आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सुद्धा पाणीच पाणी झाले शेतकरी मरणाच्या उंबरठ्यावर उभा असून शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळण्याची गरज आहे.
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेची माहिती मिळत नाही व शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत नाही आणि तालुका कृषी अधिकारी सतत गैरहजर असतात, वेळेवर शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून कृषी विभागावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे असे शिवानंद राठोड यांनी माध्यमांना सांगितले.
तहसीलदार महागाव मार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले. या वेळी शिवानंद राठोड (युवा जिल्हाध्यक्ष), प्रमोद अडकिने (युवा तालुका अध्यक्ष), दीपक हाडोळे (युवा ता.उपाध्यक्ष), सचिन उबाळे (युवा तालुका सचिव), सचिन शेळके (युवा ता. कोषाध्यक्ष), रामचंद्र चव्हाण (सदस्य), अंकुश उबाळे, संदीप कोमवाड, अनिल राठोड ,दत्ता माने, गोर बाळूभाऊ राठोड (बंजारा परिषद) व इतर शेतकरी उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();