कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
खुशी पंढरी आत्राम (5) असे मृतक चिमुकलीचे नाव आहे. सूत्राच्या माहितीनुसार, जीवन देऊळकर यांचे घराचे बांधकाम आज अंतिम टप्यात होते. उद्या त्यांच्या घराचा वास्तू होता. घरासोबत संडासचे टाकेही बांधण्यात आले, त्या संडास च्या टाक्याच्या झाकणामुळे दरवाजा लागण्यास अडथळा येत असल्यामुळे आजच त्या टाक्यावरील झकलेली पाटी काढण्यात आली होते. अशातच ती चिमुकली घरी आली, घराचा दरवाजा उघडला आणि ती नजर चुकीने टाक्यात पडली. जवळपास ती तास दीड तास त्या टाक्यात पडून राहिली, कुणाच्याही लक्षात आले नाही. तिला बाहेर काढण्यात आले. सदर घटनेने मजरा गावात हळहळ व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, देऊळकर यांच्या घराच्या बांधकामावर मृतक मुलीचे वडील हेल्पर तर, काका मिस्त्री म्हणून कामाला आहे. रोज वडिलांच्या कामावर मुलगी अधूनमधून यायची आज अंतिम टप्यात घराचे काम होते, उद्या घराचा वास्तू पूजनाचा कार्यक्रम होता, ती आज दुपारी वडिलांच्या कामावर आली होती. दरवाज्या लगत असलेल्या टाक्यात ख़ुशी पडली हे कुणाच्या लक्षातच आले नाही.
जवळपास तास दीड तास होऊन गेले असे, येथील सरपंच अनिल देवाळकर यांनी सांगितले. सायंकाळची वेळ झाली मुलगी घरी का आली नाही म्हणून तीचा सर्वत्र शोध घेतला असता, ती कुठेही आढळून आली नाहीत. म्हणून सहजच आत्राम व देवाळकर कुटुंबियांनी आपल्या टाक्यात पाहले असता ती त्या सात फूट खोल असलेल्या टाक्यात मृत अवस्थेत आढळून आली.