विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
संदिप कोटरंगे (30) रा. इंदिरा नगर (बेघर कॉलनी) हा गंभीर जखमी झाला असून, राहुल बलमवार (25) रा. पांढरकवडा याला किरकोळ मार आहे. अपघात ग्रस्ताना काही उपस्थितांनी जखमींना प्राथमिक उपचारासाठी मारेगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. अशी सूत्रानी माहिती दिली. लगेचच जखमीवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ यवतमाळ येथे 108 ने हालविण्यात आले.
वणी-मारेगाव महामार्ग वरून (एम एच 29 6317) या क्रमांकाच्या दुचाकीने वणी वरून मारेगाव कडे येत असतांना महामार्गवरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर दुचाकी चालकाचे अनियंत्रण होऊन दुचाकी रस्त्याच्या कडेला जावून आदळली. यात संदीप कोटरंगे हा गंभीर जखमी झाला असून त्याचा साथीदार किरकोळ जखमी झाल्याचे समजते. दोघांना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हालविण्यात आले असल्याची माहिती आहे.
तूर्तास वृत्त लिहेपर्यंत मारेगाव पोलीस प्रशासन दाखल व्हायची होती.