Top News

साहेब दहा टक्केही उगवलं नाही; प्रशासनाने न्याय न मिळवून दिल्यास नुकसान भरपाईसाठी ग्राहक मंचाकडे धाव घेणार - शेतकरी प्रशांत भंडारी

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : भारत हा कृषी प्रधान देश आहे असं म्हटलं जातेय मात्र या कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम प्रशासन दरबारी होत असल्याचे दिसून येत आहे. मौजा वनोजा (देवी) या परिसरात शेतकरी प्रशांत भंडारी व श्रीमती सुवर्णा ताई आवारी यांचे सुद्धा शेत आहे. हंगामानुसार त्यांनी पेरणी केली मात्र, सोयाबीनची उगवण न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्याबाबत शेतकऱ्याने रीतसर तालुका कृषी अधिकारी यांचे कडे निवेदनातून सोयाबीनचे बोगस बियाणं (विक्रांत कंपनी) विरुद्ध तक्रार करून नुकसान भरपाई ची मागणी केली.
तालुक्यातील देवी शेत शिवारातील शेतकरी प्रशांत भंडारी व श्रीमती सुवर्णा ताई आवारी यांचे सुद्धा शेत आहे. यांनी 22 ते 23 जून रोजी दरम्यान, सोयाबीनची पेरणी केली. परंतु आजपर्यंत 10 टक्के सुद्धा उगवण झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्याने तालुका कृषी अधिकारी मारेगाव यांचे कडे तक्रार केल्यानंतर कृषी पर्यवेक्षक यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व सोयाबीन उगवण न झाल्याचे शेताचे फोटो सुद्धा काढले, मात्र जवळपास 5/6 दिवस लोटूनही शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून देण्यात आली नाही. हीच परिस्थिती तालुक्यातील वडगाव, आकापूर येथील शेतकऱ्याची आहेत.
या झालेल्या नुकसानीची भरपाई आम्हांला मिळावी किंबहुना मिळवून द्यावी यासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांचेकडे तक्रारी केल्या आहे. परंतु अजूनपर्यंत त्यांना मोबदला मिळाला नाही.
या नुकसान भरपाई बाबत आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना शेतकरी प्रशांत भंडारी यांनी सांगितले की, पेरणी केली, सोयाबीन उगवले नाही. जवळपास 60 हजार ते 70 हजार रुपयाचे नुकसान झाली आहे. त्याकरिता मी संबंधित विभागाला तक्रार केली, मात्र 5 दिवस लोटूनही प्रशासन न्याय मिळवून देण्यास असमर्थ ठरत असल्यामुळे मी ग्राहक मंचाकडे धाव घेणार असल्याचे ते म्हणाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post