विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : दोन दिवस उसंत घेतल्यानंतर काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असतांना तालुक्यातील दापोरा पुलावरून किमान सहा फूच्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे या मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. बेंबळा चे १३ दरवाजे उघडल्याने नदी, नाले ओसंडून वाहत असून डाब (BACK WATER) आल्यामुळे शेतीसह शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.
बेंबळा प्रकल्प नवरगाव, अप्पर वर्धा व लोअर वर्धा ई. सर्व धरणातून पाणी नदीपात्रात सोडल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून शिवणी (धोबे) दापोरा, बोरी, चिंचमंडळ, वनोजा व कोसारा येथील शेतातील पिके पाण्याखाली आली आहे.
तालुक्यातील कपाशी व सोयाबीनची ची पिके किमान 200 हेक्टर वरील जमीन पाण्याखाली गेली आहे. अस्मानी व सुलतानी संकट शेतकऱ्यांना त्यांची नाजूक अवस्थेकडे वाटचाल करीत आहे. तालुक्यातीन फेर सर्वेक्षण करून सरसगट मोबदला देण्यात यावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांची आहे.