सह्याद्री चौफेर | न्यूज
वणी : तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शिरपूर रोड वर सरकारी दवाखान्याच्या समोर लांब पल्याच्या ट्रक वरील लोडेड मशीन त्या ट्रक च्या
पल्यावरून खाली घसरले. तर दुसरे वाहन (MH 40 CD 84 64) या क्रमांकाचे सुद्धा टिपर त्याच्या बाजूला फसल्याने या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.
मागील 7 ते 8 दिवसापासून पाऊसाने तालुक्याला झोडपून काढल्याने सर्वत्र चिखलमय वातावरण निर्माण झाल्याने रस्त्यावरील पाणी,खड्डे दिसून पडत नाही. त्यामुळे मार्गांवरील खड्डे अपघातास निमंत्रण देत आहे अशी उपस्थितांनी मत व्यक्त केली. सदर मार्गांवर येणाऱ्या जाणाऱ्या चारकाकी वाहणाच्या लांबच लांब रांगा झाल्याचे जत्रेचे स्वरूप आल्याची आठवण करून जाते.