विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : मागील सात दिवसापासून पावसाने सर्वत्र हाहाकार माजवल्यानर 15 ते 16 या दोन दिवसात वरुणराजाने काहीशी उसंत घेतली होती, त्यामुळे तालुक्यातील शेती कामाला वेग आला, शेतकरी शेतमजूरात आनंदाचे वातावरण असतांना आज पुन्हा पावसाने आपली रिपरिप सुरु झाल्याने यंदा शेती व मजुरी'चा विषय बिकट होईल का काय? असे बोलल्या जात आहे. शेतकऱ्यांसोबत मजूरवर्गाचे सुद्धा बेहाल होण्याची चिंता व्यक्त होत आहे.
यंदा पावसाची सर्वत्र जोरदार हजेरी लावणे सुरु असून त्यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. आता वरुणराजा नको, खूप झाले म्हणत बळीराजा हतबल होऊन पावसाला साकडे घालत असतांना पावसाची आज पुन्हा रिपरिप सुरु झाली, आणि शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली.
तालुक्यात अतिवृष्टी, त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना कोणतीही शासनाची मदत मिळाली नाही, ना प्रशासनाने त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी धरपळत असल्याचे "गुण" दिसून येताना दिसत नसल्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट तर शेतमजूरावर उपासमारीची वेळ यायला वेळ लांबणार नाही.
तूर्तास पावसाची शहरासह ग्रामीण परिसरात पुन्हा पावसाची रिपरिप सुरु..!