सह्याद्री चौफेर | न्यूज
चंद्रपूर : इरई नदीच्या पुरामुळे (लखमापूर) आझाद नगर झोपडपट्टीतील लोकांचे पुराच्या पाण्यामुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, या नुकसानीची माहिती श्री अनिल डोंगरे प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा यांचे माध्यमातून माननीय आमदार.श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री यांना देण्यात आली असता मा. सुधीर भाऊंनी झोपडपट्टीतील लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचे ठरविले.
दि. 16 जुलै रोजी मा श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून शंभर टक्के झोपडी ची पडझड झालेल्या 40 परिवारांना ताडपत्री व वस्तीतील सर्व परिवारांना 200 अनाज किराणा किटचे वाटप करण्यात आले. या वाटप कार्यक्रमाप्रसंगी मा.श्री.देवराव दादा भोंगळे जिल्हा अध्यक्ष भाजपा, मा.श्री.रामपाल सिंग भाजपा जेष्ठ नेते, मा.श्री.नामदेव डाहुले जिल्हा महामंत्री भाजपा, मा.श्री.अनिल डोंगरे प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा, मा. श्री.शांताराम चौके, मा.श्री.विलास टेंभुर्णे, मा.श्री.नामदेव आसुटकर, सौ.वंदना ठाकरे, सौ.समता गोचे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या मदतीदरम्यान आझाद नगर वस्तीतील लोकांनी आपल्या भावना व्यक्त करित असतांना ते म्हणाले की, कठीणातील कठीण प्रसंगाच्या वेळी, वेळोवेळी आम्हा गरीब झोपडपट्टी वासीयांच्या मदतीला धावून येणारा एकच नेता तो म्हणजे आमचा सुधीर भाऊ असून, आमच्यासारख्या झोपडपट्टीतील राहणाऱ्या लोकांना असा नेता मिळणे हे आमचे भाग्य आहे.
