कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तमराव गेडाम साहेब (निवृत्त गट शिक्षणाधिकारी) होते तर सत्कारमूर्ती म्हणून अॅड देविदासजी काळे, सुरेशजी बरडे, अॅड घनशामजी निखाडे व उदयजी रायपूरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी श्री. रंगनाथ स्वामी च्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. अॅड देवीदासजी काळे साहेब यांनी आपल्या भाषणातून अथक परिश्रमातून संस्थेचा विकास साधल्याचे नमूद केले. तसेच विविध विषयावर प्रकाश टाकला. सत्कारमूर्ती म्हणून अॅड देविदासजी काळे, सुरेशजी बरडे, अॅड घनश्यामजी निखाडे,
उदयजी रायपूरे या सर्व मान्यवरांचा अभीकर्त्याच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मारेगाव शाखेचे व्यवस्थापक अमोल मांडवकर, अभिकर्ता पुरुषोत्तम दरेकर, विलास होलगीलवार, इसाक शेख विशाल खंडाळकर, महेश खंगार, राजू बदकी,
हिरेंद्र लिहितकर, कैलास चौधरी, मधू रिंगोले
रवी बोबडे, सुधीर ढेंगळे, अवी चार्लिकर, प्रवीण हाते, रवींद्र खोंडे, मारोती बेसेकर, तथा सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन अशोक कोरडे यांनी केले तर, आभार सचिन ढोके यांनी मानले.