विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : मौजा रामपुर येथील एक युवक गावालगत असलेल्या तलावात बेपत्ता झाला होता, ही घटना दोन दिवसाअगोदर घडली होती. त्यात शोध पथक शोध दोन दिवसापासून शोध घेत असतांना त्यांना यश आले नाही. आज दि.16 जुलै रोजी पहाटे साडे चार वाजताच्या सुमारास त्या तलावात बेपत्ता झालेल्या युवकाचे प्रेत च बाहेर तरंगताना आढळून आले.
तालुक्यातील रामपूर येथील तीन युवक दि.14 जुलै रोजी तलावात मासे पकडण्यासाठी गेले होते. त्यापैकी एक युवक अचानक बेपत्ता झाला होता. या घटनेने रामपुर (कुंभा) परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तो युवक तेथे बुडाल्याचा अंदाज नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत होता.
त्या पंचवीस वर्षीय युवकाचा शोध घेण्यासाठी यवतमाळ जिल्हा शोध बचाव पथक दोन दिवसापासून तलावात शोध घेत होते, परंतु त्याचा कुठेही पत्ता लागला नाही, अखेर आज शनिवारला सकाळी साडे चार वाजताच्या सुमारास त्याचे प्रेत तलावातील पाण्यावर तरंगताना दिसून आले.
बापुजी भाऊराव आत्राम (25) असे तलावात बुडून मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. त्याला बाहेर काढण्यात आल्यानंतर शवविच्छेदनासाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले अशी माहिती आहे.
नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन पाठकच्या वतीने जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच पुराच्या पाण्यात किंवा ओसंडून पाणी वाहत असलेल्या ठिकाणाहून कोणीही पाण्यात जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.