बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर
उदगीर : उदगीरच्या मुख्य रस्त्यावरील पक्के अतिक्रमणे काढल्याशिवाय रस्त्याचे व नालीचे काम करू नये, यासाठी उदगीर जिल्हा मराठी पत्रकार परिषद व मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने 24 जून 2022 पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, उदगीर येथे पत्रकारांचे बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे.
आज तागायत पत्रकारांनी तिर्डी आंदोलन, हलकी आंदोलन, टाळी वाजवणे आंदोलन, भजन आंदोलन, केलेले आहे. उदगीर, जळकोट तालुक्याचे धडाडीचे आमदार तथा माजी गृहमंत्री संजय बनसोडे यांनी 481 कोटी रुपये पाणी योजनेच्या कामासाठी मंजूर केल्याबद्दल, त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, उदगीर येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी त्यांनी धरणे आंदोलन करणाऱ्या पत्रकाराकडे पाठ फिरवली असून, आंदोलन करणाऱ्या पत्रकारांना त्यांनी भेट दिलेली नाही. याबाबत जनतेत उलट सुलट चर्चा चालू आहे. येत्या 18 जुलै 2022 रोजी औरंगाबाद येथे आयुक्त कार्यालयासमोर निष्क्रिय प्रशासनाच्या विरोधात आंदोलन कार्यकर्त्यांच्या वतीने एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.