टॉप बातम्या

पावसाने उसंत घेताच शौकीनांनी भरवला कोंबड बाजार, पोलिसांनी धाड टाकताच जुआरी झाले होते दानाफान

                                                      (file photo)
कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : पावसाने उसंत घेताच जुगार शौकीनांनी "कोंबड बाजार" भरवला. याबाबत पोलिसांना सुगावा लागताच वणी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या केसूर्ली जंगलातील कोंबड बाजारावर वणी पोलिसांनी धाड टाकली. यात 21 दुचाकी सह सात लाखाच्या वर मुद्देमाल जप्त केला असून सहा आरोपिंना ताब्यात घेतले.
मागील सहा सात दिवसापासून पाऊस सुरु होता, कालपासून वरुणराजाने उसंत घेतली असतांना दि.15 जुलै रोजी सायंकाळी केसूर्ली जंगलात कोंबड बाजार शौकीनांनी भरवला. तालुक्यात या कोंबड बाजाराचे मोठ्या प्रमाणात शौकीन असल्याचे बोलल्या जाते, त्यामुळे शौकीनांची 'निड' हेरून हा बाजार सुनसान जंगल, शिवारात भरवल्या जात असतात. असाच शुक्रवारी सायंकाळी केसूर्ली च्या जंगलात कोंबड बाजार भरवल्या जात असल्याची 'खबर' पोलिसांना मिळाली त्या आधारे अतिशय गुप्तपणे कोंबड बाजारावर धाड पोलिसांनी टाकली.
यात शौकीनांची चांगलीच तारांबळ उडाली, पळता वाट झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. यात पोलिसांनी घेराव घालत सहा जणांना अटक केली. स्पॉट वर दुचाकी तशाच स्टॅन्ड होत्या, त्या 21 दुचाकी जप्त केल्या. तर झुंजी वर पैसा खेळणाऱ्याकडून रोख 11 हजार 350 रुपये हस्तगत करण्यात आले. दरम्यान, घटनास्थळी एक मरणासुन्न कोंबडा, दोन लोखंडी धारदार कात्या, असा एकूण सात लाख 26 हजार 950 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप पा. भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रामकृष्ण महल्ले, सहाय्यक पोलीस निरीक्षक माधव शिंदे, पोहवा सुहास मंदावार, संतोष आढाव, विठ्ठल बुरुजवाडे, पोकॉ पुरुषोत्तम डडमल, निरंजन खिरटकर, भानुदास हेपट, विशाल गेडाम, महेश बाडलवार यांनी केली. 
     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 9011152179
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();