टॉप बातम्या

भीषण ट्रक अपघातात युवक जागीच ठार

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : यवतमाळ वणी हायवे वरील पळसोनी फाट्याच्या पुढे एका भरधाव अज्ञात वाहनाने 30 वर्षीय कामगारास धडक देवून पसार असून, या अपघातातील युवक जागीच ठार झाला. ही घटना आज शनिवारी सायंकाळी 8 वाजताच्या दरम्यान घडली.
विपीन खंडाळकर रा. निंबाळा असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. कोल सायडींग मधून विपीन काम करून घराकडे निघाला असता, अज्ञात भरधाव ट्रक ने त्याला चिरडले, साधारणता: 200 मीटर पर्यंत मृतकाला घासत नेले,अशी चर्चा आहे. या अपघातात युवक जागीच ठार झाला असून अज्ञात ट्रक ठोस मारून ट्रक फरार झाल्याचे समजते. 
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. घटनास्थळी नागरिकांचा जमाव झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या आधीही एका 42 वर्षीय मुकेश नामक तरुणाला अज्ञात वाहनाने उडवून पसार झाला होता, नुकतीच ही घटना ताजी असतांना पुन्हा अशाच प्रकारे घटना घडली. त्यामुळे अज्ञात वाहनाच्या घटनेत वाढ होत असल्याचे बोलल्या जात असून या वणी यवतमाळ मार्गाने प्रवास करणे चिंतेचा विषय झाला आहे. 
सदर घटनेचा अधिक तपास पोलीस करित आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();