टॉप बातम्या

WORLD SNAKE DAY : साप दार वाजवून येत नाही


          
              "WORLD SNAKE DAY" - 16 जुलै 

मित्रांनो पावसाळा सुरु झाला आहे. खास करून शेतीचे काम आता जोरात सुरु झाले आहेत. पाणी आला कि सापाचा बिळात पाणी जाते व ते बाहेर निघतात. एक लक्षात घ्या तुमचा भेटीला "दार "न वाजवता कधीही येऊ दारात येऊ शकतात. सध्या पक्ष्यांबरोबरच सरपटणाऱ्या प्राण्यांची खूप विविधता पाहायला मिळते. विविध जातींचे साप, सरडे, विंचू, सापसुरळ्या अशा अनेक सरपटणाऱ्या प्राण्यांबरोबरच सध्याच्या गर्द हिरवाईत अनेक प्रकारचे विषारी किडे आपल्याला नकळत दिसून येतात. 
असं म्हटलं जात "साप" किडे हे दार ठोठवून येत नाही. त्यामुळे सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे नागरी, पोड, वाडा, वस्तीत वास्तव करणाऱ्या लोकांनी या सरपटणाऱ्या प्राण्यापासून सावधान राहल पाहिजेत त्यासाठी विशेष काळजी म्हणून रात्री काळोखातून बाहेर पडताना, शेतात, बांधावर, गवतातून चालताना टॉर्चचा वापर करावा अशी खबरदारी घ्यावी तसेच यानंतरही सर्पदंश झाल्यास प्रथमत: त्या रुग्णास नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा रुगणालयात तसेच नजीक असल्यास ग्रामीण रुग्णालयात घेवून जावे. 
अतिवृष्टीमुळे सरपटणारे प्राणी अलगद बिळातून बाहेर फिरत असतात. आतातर नागरी वस्ती, परिसरात येऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून दंश होण्याच्या घटना घडत असल्याच्या आपण पाहत वाचत असतो. मित्रांनो पावसाळा सुरु झाला आहे. खास करून शेतीचे काम आता जोरात सुरु झाले आहेत. पाणी आला कि सापाचा बिळात पाणी जाते व ते बाहेर निघतात. आणि तुमचा भेटीला दार न वाजवता कधीही येऊ शकतात. विशेषत: रात्री त्यांची भेट टाळायची असेल तर त्यासाठी आपण घेतलेली काळजी. साप हे झाडीत अडगडीत म्हणजे दमट, अंधाऱ्या ओलसर जागी राहणे पसंद करतात. हे लक्षात घेतल्यास सर्पदंश टाळण्यासाठी आपण खालील खबरदारी घेऊ शकतो.
• रात्रीच्या वेळी जमिनीवर झोपणे टाळा !

• घराजवळ विटाचे तुकडे काठी पाला पाचोळा ठेऊ नये उंदीर बेडूक घूस घरात येणार नाही हि काळजी घ्या !

• रात्रीचा वेळेला अंधारामध्ये टोर्च घेऊनच बाहेर निघा !

• शेतामध्ये पायात बुटचा वापर करा !

• घरातील सांडपाणी बाहेर जाण्यासाठी असलेल्या सर्व आउट लेटला पक्की जाली बसवून घ्या !

• साप लपतील अशी ठीकांने नष्ट करावीत. भिंती कुंपण यांना तडा अथवा भोके पडली असल्यास व्यवस्थित बुजवून घ्यावीत !

• अडचणीत व अडगडीत हात घालतान आत काही नाही याची खात्री करूनच हात घालावे !
साप तुमच्या परिसरात आढळल्यास सापाला कुठलीही इजा न पोहचवता जवळील सर्पमित्रांना बोलवावे. सर्पमित्र येईल तोपर्यंत सापावर सुरक्षित अंतर ठेऊन नजर ठेवावी जेणेकरून सर्पमित्रांना सापाचा शोध लवकर घेता येईल.

त्यामुळे आजच्या या "वर्ल्ड स्नेक डे" च्या निमित्ताने आपणास आपल्या परिसरातील सर्पमित्रांची नावे पुढीलप्रमाणे :

सर्पमित्र हरीश कापसे (वणी) : 7350264964

सर्पमित्र अर्जुन राठोड (करंजी) 7796393878

सर्पमित्र सोनू कवाडे (करणवाडी) 7972248765 मारेगाव

सर्पमित्र गजानन क्षीरसागर (केसूर्ली) 9284870679

सर्पमित्र अविनाश हिवलेकर (वाघदरा) 8080244250 वणी

सर्पमित्र शुभम तिरडकर (निवली) 7875428363

सर्पमित्र नितीन माणुसमारे (तरोडा) 9763881652
सर्पमित्र अनिकेत कुमरे 9604530354

सर्पमित्र सुरज पारशिवे (उकणी) 9689599822

सर्पमित्र रमेश भादीकर 8237984191

सर्पमित्र रवि नन्नावार 8975552987

सर्पमित्र राजू भोगेकर (सुंदरनगर) 8237984191

सर्पमित्र गजानन येवल (महागांव) 9673739775


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();