टॉप बातम्या

तलावात तीन पैकी एक बेपत्ता; मारेगाव तालुक्यातील रामपूर (कुंभा) येथील घटना

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : मौजा रामपूर येथील तीन युवक गावालगत असलेल्या तलावात मासे पकडण्यासाठी शिरले, दोघे जन बाहेर आले त्यापैकी एक जन बेपत्ता झाल्याचे समजते. ही धक्कादायक घटना आज 14 जुलैला दुपारी 3 वाजताचे दरम्यान घडली.
बापूजी भाऊराव आत्राम (25) असे मासे पकडण्याच्या नादात बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेने रामपूर (कुंभा) परिसरात खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार रामपूर येथे गावालगत तलाव असून येथील अमोल टेकाम, अतुल मेश्राम व बापूजी आत्राम हे तिघेही मासे पकडण्यासाठी तलावात शिरले. तलावात जाळे टाकल्यानंतर बाहेर निघण्याच्या नादात दोघेजन सुखरूप निघाले. मात्र, बापूजी हा अचानक तलावात बेपत्ता झाला, त्याचा करून अंत झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

पोलीस प्रशासनाला याबाबत माहिती देण्यात आली असून, पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, बेपत्ता झालेल्या बापूजीचा शोध सुरु आहे. तूर्तास तलावातील पाण्याची पातळी वाढल्याने शोध कार्यास अडसर निर्माण होत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();