टॉप बातम्या

सावंगी'त गरोदर महिलेसह 9 लोकांना सुरक्षित स्थळी हलविले

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : मागील सहा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे वणी तालुक्यातील नदी, नाल्यांना पुराचे पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे निर्गुडा नदीच्या काठच्या गावांना पुराच्या फटका बसला असून, सावंगी गावाचा बॅक वॉटरमुळे संपर्क तुटला आहे. आज नवीन सावंगी येथून आजारी असलेल्या 9 लोकांना शोध मोहीम राबवून बचाव पथकाने पुराच्या पाण्यातून सुरक्षितरित्या  त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. यामध्ये एका गर्भवती महिलेचा समावेश आहे. ती नऊ महिन्याची गर्भवती असल्याची समजते. 
तालुक्यातील जुगाद, साखरा, सावंगी, घोंसा, कवडसी, दहेगाव, चिंचोली या गावांमध्ये पूर परिस्थिती अवाक्या बाहेर असून जनजीवन प्रभावित झाले आहे. निर्गुडा नदीचा मेळ हा वर्धा नदीला होतो. अशातच वर्धा धरणाचे वर्धा नदीच्या पात्रात पाणी सोडल्याने मोठ्या प्रमाणात बॅक वॉटरचा वेढा गावांना बसत आहे. सावंगी या गावाला सुद्धा एक ते दीड किलोमीटर बॅक वॉटरचा वेढा बसलेला आहे.

नवीन सावंगी आणि जुन्या सावंगी यामध्ये मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी असल्यामुळे दोन्ही गावांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे. नवीन सावंगी मध्ये सुमारे हजार लोकवस्ती असून शोध व बचाव पथक तैनात करण्यात आले आहे. आज येथील 9 लोकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. यामध्ये एका गर्भवती महिले सोबत 3 मुलांचा तसेच मूत्रपिंड आजाराने ग्रस्त असलेल्या वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे.
पुर परिस्थितीतून सुरक्षित स्थळी हलविलेल्या व्यक्तीमध्ये रामचंद्र गोपाळा वाघमारे, शांता रामचंद्र वाघमारे , बंडू रामचंद्र वाघमारे, विजू खिरटकर, वेदांत विजू खिरटकर, मनीष विजू खिरटकर, प्रदीप आसुटकर, निराक्रश प्रदीप आसुटकर, तसेच गर्भवती महिलेचा यात समावेश आहे. या कुटुंबीयांना सुरक्षितरित्या बाहेर काढल्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शोध व बचाव पथकाचे अभिनंदन केले  तर नागरिकांकडून कौतुकाची थाप मिळत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();