टॉप बातम्या

शिवसेने पाठोपाठ काँग्रेसची मागणी - अतिवृष्टीने पाण्याखाली गेलेल्या शेतीचे व पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : जिल्ह्यासह मागील आठ दिवसांपासून प्रचंड प्रमाणात पाऊस सुरु आहे. याचा फटका नुकतेच पीक शेतावर बहरत असताना अतिवृष्टीसह बेंबळा प्रकल्पाचे चुकीचे नियोजन व सदोस कार्य पद्धतीने कालवे जागोजागी फुटून तडाखा बसला आणि पाहता पाहता होत्याचे नव्हते झाले.
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगाम पूर्णतः गेला असून, त्यासोबत शेतीही पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला शासनाच्या मदतीची गरज आहे. त्यासाठी पिकांचे व पाण्याखाली गेलेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शिवसेने पाठोपाठ काँग्रेस कमिटी मारेगाव च्या वतीने करण्यात आली.
यावेळी माजी सभापती महिला बालविकास जि प यवतमाळ अरुणाताई खंडाळकर, उप सभापती कृऊबा मारेगाव वसंत आसुटकर, तालुकाध्यक्ष मारोती गौरकार, सरचिटणीस शरीफ अहमद कुरेशी, उदय रायपुरे, गणू थेरे, अशोक धोबे, जगदीश काटवले, नाना दाखरे, गुलाब बरडे, मारोती सोमलकर यांनी तहसीलदार यांच्या मार्फत शासनाला निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पावसाने थैमान घातले आहे. आठ दिवसापासून तालुक्यातील शेतकऱ्यांना सूर्यदर्शन नाही. आज आठव्या दिवशी पावसाची अधून मधून रिपरिप काही प्रमाणात सुरूच आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला. दुबार व तिबार पेरणी करून शेतावर नुकतेच सोयाबीन, कापूस हे पिके बहरू लागताच त्यांना अतिवृष्टीचा फटका बसला. तसेच बेंबळा प्रकल्पाच्या कालव्याने तर काही ठिकाणी चक्क जमीनच खरडून गेल्याने शेतकऱ्यांना समोर मोठा प्रश्न निर्माण झाला. शेतकरी हवालदिल झाला असून, त्याला शासनाच्या आर्थिक मदतीची गरज निर्माण झाली आहे.
खचलेल्या शेतकऱ्यांना नव्याने सत्तेत बसलेल्या सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे व जमिनीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी व मारेगाव तालुका ओला घोषित करावा,अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्या पाठोपाठ काँग्रेस कमिटी च्या वतीने मारेगाव तहसीलदार पुंडे यांना देण्यात आले आहे. यावेळी काँग्रेस तालुका पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();