शेतकऱ्यांचे महागांव तहसीलदार यांना निवेदन

नंदकुमार मस्के | सह्याद्री चौफेर 

महागांव : तालुक्यातील कासारबेहळ, सेवानगर, वरोडी, वरोडी (जुनी), या गावातील शेकडो शेतकरी, शेतमजूर आज दि.01 जुलैला महागांव तहसील कार्यालयावर धडकले असून तहसीलदार साहेब यांना विविध मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

सविस्तर असे की, शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत वन्यप्राणी शेतातील पिके फस्त करित आहे. कळपाच्या कळप पिकांचे नुकसान करत असल्याने हातातील पीक जाण्याची शक्यता तसेच रात्र शेतात जागल्याशिवाय पर्याय नाही, परिणामी वन्य प्राण्यांचा शेतात हैदोस घालणे सुरु आहे. लाईट चा पुरवठा नसल्याने शेतामध्ये अंधारात रात्र काढणे हे जीव धोक्याचे असल्यामुळे या गंभीर बाबीकडे वन विभाग व संबंधित विज महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने आम्ही सर्व गावकरी अशी मागणी करित आहे की, परिसरात वाघाची दहशत असल्यामुळे एजी लाईन किमान 1 फेज तरी 24 तास द्यावा, अनंतवाडी सबस्टेशन ते वरोडी टेल पर्यंत वायरिंग बदलून घेणे, वरोडी ते कासारबेहळ फिडर वेगळे करून देणे, एजी व गांव फिडर डिपी मेन्टनन्स करणे, व या परिसरातील लाईनमन व्यवस्थित सेवा (service) देत नसल्याने त्याची एकतर बदली करा किंवा त्याला समज द्या, जर येत्या सात दिवसात मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही सर्व गावकरी आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसू अशा ईशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

सध्या पेरणी आटोपली पाऊस मात्र, दडून बसल्याने बळीराजा चिंतेत आहे. एकीकडे वाघाची दहशत तर दुसरीकडे निसर्ग कोपल्याने शेतकरी राजा हतबल झाला आहे. परिणामी वन्य प्राण्यांचा हैदोस व पाण्याअभावी माल हातून जाईल असे असतांना संबंधित प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याने शेकडो शेतकरी तहसील कार्यालयावर आज धडकले आहे.
यावेळी माजी पं स सदस्य संदीपभाऊ ठाकरे, नंदकुमार मस्के, प्रमोद अडकीने, राधेश्याम कवाने, उल्हास अडकीने, पंजाबराव कदम, शिवाजी अडकीने, मोहन कऱ्हे, अरविंद शिंदे, मोहन चव्हाण, सुनील राठोड, यशवंत तावडे, मुन्ना राठोड, संजय चव्हाण, निरंजन कवाने, संजय पावडे, सदानंद जाधव, विठ्ठल कऱ्हे, माधव कवाने, उत्तम वारकड सखाराम गानारकर, महेश तुमवार, दीपक मकडे, अरविंद ठाकरे, बालाजी माके, पुंगाजी इलेवाड, संदीप ठागे , संभाजी पावडे, भगवान कवाने,अवधूत पत्रगळे, रवि कवाने भावराव जाधव आदिसह शेतकरी व गावकरी उपस्थित होते. 

शेतकऱ्यांचे महागांव तहसीलदार यांना निवेदन शेतकऱ्यांचे महागांव तहसीलदार यांना निवेदन Reviewed by सह्याद्री चौफेर on July 01, 2022 Rating: 5
Powered by Blogger.