सह्याद्री | चौफेर न्यूज
वणी : श्री रंगनाथ स्वामी नागरी पतसंस्थेच्या निवडणूकीची रणधुमाळी चांगलीच रंगात आलीय. प्रचारात कुठेही कसूर होता कामानये म्हणून प्रत्येक गाव घर मोहल्ला पिंजून काढली जात असतांना पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्षापेक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्या कार्याकडे मतदारांची जास्त पसंती असल्याचं बोललं जात आहे. त्याचं कारणही तसंच असल्याचे सांगितलं जातं.
पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीमध्ये तांबेकरांच्या सूक्ष्म नियोजन व मनमिळावू स्वभावाने पतसंस्थेला परिसरात भक्कम उभं होता आले. छोटे मोठे व्यवसाय वाढीस आले शिवाय संस्थेच्या शाखेचा विस्तार जिल्ह्याच्या बाहेरही वाढविता आला. त्यामुळे त्यांच्याकडे आता विकासपुरुष म्हणून बोट दाखवलं जातं आहे. संस्थेच्या यशस्वीतेसाठी नेहमीच त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यामुळे ही निवडणुक यावेळी प्रतिष्ठाची ठरणार आहे.
वणी विधानसभा क्षेत्रात सर्वात जास्त नावाजलेली रंगनाथ स्वामी पतसंस्थेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनलचे घमासान असून,येत्या 26 जून रोजी होणाऱ्या निवडणूकीत परिवर्तनच दिसेल असे विविधांगी प्रचारातून निदर्शनास येत आहे.
रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे मतदानकर्ते परिवर्तनाच्या वाटेवर!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 24, 2022
Rating:
