अंगावर विज कोसळून विवाहित इसम ठार

विवेक तोंडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यातील चोपण येथील शेतमजूर अंगावर विज पडून दगावला. ही घटना 23 जून रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान घडली. संतोष महादेव बावणे (44) असे मृतक शेतमजूराचे नाव आहे.
चोपण परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस व विजेचा कडकडाट सुरु झाला, अशातच संतोष बाथरूम मध्ये लघुशंकेला गेला आणि अचानक विज त्याच्या अंगावर कोसळली. जोराने ओरडल्याने मुलगा व वडील त्याच्याकडे धाव घेतली. संतोष लगेचच उचलून वणी च्या खासगी रुग्णालयात दाखल असता डॉक्टरांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात घेवून जाण्याचा सल्ला दिला. ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
संतोष याच्या पश्चात पत्नी, आई वडील व दोन मुले असा आप्त परिवार आहे. 
अंगावर विज कोसळून विवाहित इसम ठार अंगावर विज कोसळून विवाहित इसम ठार Reviewed by सह्याद्री चौफेर on June 23, 2022 Rating: 5
Powered by Blogger.