आज राजूर कॉलरी येथे रास्ता रोको आंदोलन

चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

वणी : रेल्वे प्रशासन व वेकोली प्रशासनाकडून गावातील जनतेला मिळालेल्या जागा खाली करण्याच्या नोटीस मुळे संपुर्ण गावच उध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला असल्याने "राजूर बचाव व प्रदूषण मुक्त गावं" हा संघर्ष करण्याची वेळ आली आहे. त्या अनुषंगाने आज दिनांक 8 जून सकाळी 10 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन गावातील भगतसिंग चौकातून निघून ते राजूर रिंगरोड (सिमेंट गोडाऊन) येथे येऊन सवैधानिक मार्गाने रास्ता रोको आंदोलन करेल.
गावातील जनतेचे प्रश्न, प्रदूषणमुक्त गावं, पुनर्वसन व इतर विषयांवर सरकारी प्रशासन, रेल्वे प्रशासन, वेकोली प्रशासन, शासकिय व निमशासकीय यंत्रांनाना गावातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी भाग पाडेल. आपल्या निवास व घरकुलाच्या संवैधानिक अधिकार मिळवून घ्यायचा आहे.
करीता सर्व राजूर (कॉलरी) वासियांनी आज होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनात मोठया संख्येने आपण न चुकता भगतसिंग चौकात सकाळी 9:30 वाजता उपस्थित राहावे. असे आवाहन राजूर बचाव संघर्ष समिती च्या वतीने करण्यात आले आहे.
आज राजूर कॉलरी येथे रास्ता रोको आंदोलन आज राजूर कॉलरी येथे रास्ता रोको आंदोलन Reviewed by सह्याद्री चौफेर on June 08, 2022 Rating: 5
Powered by Blogger.