अल्पवयीनचा अडवून विनयभंग, आरोपीस अटक

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यातील टाकरखेडा येथे 14 वर्षाची अल्पवयीन विद्यार्थीनी आपल्या मैत्रिणीसोबत ट्युशन ला जात होती. मांगरूळ येथील हर्षल धंदरे याने अल्पवयीनला वाटेत अडवून तिचा हात पकडून विनयभंग केला. ही घटना शासकीय आयटी आय (ITI) जवळ घडली.
नेहमीप्रमाणे अल्पवयीन खासगी क्लासेसकरिता आपल्या मैत्रिणी सोबत जात असतांना हर्षल मोटरसायकलवरून तिच्या जवळ आला आणि रस्ता अडवून विनयभंग करित तिला मोबाईल नंबर मागितला. पीडितेने मैत्रीच्या मदतीने कशीबशी सुटका करून घर गाठले आणि घडलेला प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला.
पीडित मुलीच्या घरच्यांनी मारेगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून मारेगाव पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
"तालुक्यात दिवसेंदिवस आत्महत्या, मारहाण, बलात्कार या सारख्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. कायद्याचा धाक आणि खाकीचा चाप कमी झालाय की, काय लोकात भीतीच राहिली नाही असे दिसून येते. मागील महिन्याभरा चा आलेख बघितला तर लक्षात येईल की, तालुक्यात गुन्हेगारी कमी होण्याचं नाव घेत नाहीये". - नागरिक
अल्पवयीनचा अडवून विनयभंग, आरोपीस अटक अल्पवयीनचा अडवून विनयभंग, आरोपीस अटक Reviewed by सह्याद्री चौफेर on June 17, 2022 Rating: 5
Powered by Blogger.