टॉप बातम्या

विवाहित तरुणांची गळफास घेवून आत्महत्या, करणवाडी येथील घटना

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यात आत्महत्या चे सत्र सुरूच आहे. मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तालुक्यातील करणवाडी येथील एका विवाहित तरुणाने गळफास घेवून आपली जीवन यात्रा संपविली आहे.
प्रशांत अरूण काळे (31) असे गळफास घेतलेल्या विवाहित तरुणाचे नाव आहे. त्याने घरात असलेल्या खोलीमध्ये मध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना १७ जुन रोजी रात्रीच्या ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून प्रशांत यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, व पाच महिन्याचा मुलगा आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात असून पुढील तपास मारेगाव पोलीस करित आहे.
बातमी व जाहिरातसाठी संपर्क : 9011152179
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 9011152179
Previous Post Next Post