ज्येष्ठ नागरिक निराधार संघटनेच्या वतीने इडी'चा निषेध

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

हिंगणघाट : येथील ज्येष्ठ नागरिक निराधार संघटना महाराष्ट्र प्रदेश व महीला काँग्रेस हिंगणघाटच्या वतीने ईडी (ED) चा निषेध करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मंगलाताई ठक ज्येष्ठ नागरिक निराधार संघटना यांच्या  नेतृत्वात नायब तहसीलदार पठाण साहेब यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी एकीकडे देश हितासाठी नेहमीच कटाक्षाने लढण्यास तयार असतात आणि देश हितासाठी रात्रंदिवस मेहनत करत असतात. मात्र,केंद्राकडून खासदार राहुल गांधी यांना वारंवार ईडी (ED) कडून नोटीस पाठवून त्रास दिल्या जाते, ऐन निवडणूकासमोर असताना ईडी (ED) कडून नोटीसा वारंवार येणे म्हणजे कामाचे मुद्यावरून भटकविण्याचा प्रयत्न केल्या जातो असा आरोप निराधार संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
राहुल गांधी व गांधी घराण्यांनी नेहमी युवकांचे प्रश्न, रोजगार, शिक्षण, बेरोजगारी व्यापार, उद्योग यांचे वर भर देऊन देशाची अर्थ व्यवस्था बळकट कशी करता येईल याकरिता भरीव काम केले आहे. देशासाठी गांधी घराण्याने मोठे बलिदान दिले, प्राणाची आहुती दिली आणि आज तीच वारसा राहुल गांधी चालवीत असताना केंद्राकडून राहुलजींना इडी चे नोटीस पाठवून त्यांना त्रास देण्याचे काम सरकार करीत आहे. या प्रकरणाचा आम्ही कटाक्षाने निषेध करत आहोत.
उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत केंद्र सरकार ला निवेदन देण्यात आले आहे. या वेळी तालुक्यातील शेकडो गावकरी,महीला भगिनी व पुरुष बांधव उपस्थित होते.  
ज्येष्ठ नागरिक निराधार संघटनेच्या वतीने इडी'चा निषेध ज्येष्ठ नागरिक निराधार संघटनेच्या वतीने इडी'चा निषेध Reviewed by सह्याद्री चौफेर on June 22, 2022 Rating: 5
Powered by Blogger.