पतसंस्थेच्या प्रगतीमुळे अनेकांच्या लघु, सूक्ष्म उद्योगाला चालना मिळाली - अॅड देविदास काळे

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : अॅड देविदास काळे समर्थित जय सहकार पॅनलची विजयाकडे वाटचाल निश्चित असून तशी सहकारची लाट तयार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रचार सभा, भेटी गाठी व मतदार बांधवानी पतसंस्थेची यशस्वी घोडदौड "सहकार" च्याच हाती कायम ठेवावी याकरिता मतदारांना जागृत केले जात आहे. त्याला मतदारांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे.
26 जूनला रंगनाथ स्वामी पतसंस्थेची निवडणूक होऊ घातली आहे. तेंव्हा मतदारांनी छ्त्री या बोध चिन्हा समोर फुलीचा शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजयी करावे, यासाठी सहकार पॅनलचे कार्यकर्ते व काळे साहेबांना मानणारा वर्ग मोठ्या जोमाने प्रचार कार्याला लागला आहे. 
त्यामुळे विधानसभा क्षेत्रात सहकार पॅनलचे विजयाचे वातावरण विरोधकांना भारी पडेल अशी चर्चा एकावयास मिळत आहे. 
विशेष उल्लेखनीय की, सहकार क्षेत्रात नावाजलेली पतसंस्था म्हणून श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था वणी सह विदर्भात प्रथम क्रमांकांची म्हणून ओळखली जाते. अॅड. देविदास काळे यांच्या विस वर्षाच्या कार्यकाळात या पतसंस्थेची यशस्वी घोडदौड सुरु आहे. ती या पुढेही राहील. या पतसंस्थेला प्रगतीपथावर नेण्यात अॅड. काळे यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचा कार्यकाळ सभासदांना सर्वश्रुत आहे. म्हणूनच म्हटलं जात की "आम्ही बोलत नाही,आमचा विकास बोलतो".
ही टॅग लाईन सभासदांच्या मतात, सभासदांच्या मनात घर करित असून,विजयी भव असा आशीर्वाद दिल्या जात आहे. 
विदर्भ प्रांत मध्ये रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे 42 हजार सभासद आणि 22 शाखा आहेत. एवढी अफाट प्रगती आज या पतसंस्थेनं केली, ते अॅड. देविदास काळे यांच्या अध्यक्षपदी असण्याणेच. 2001 ला ते या पतसंस्थेचे अध्यक्ष झाले, व अनेकांच्या लघु उद्योग, सूक्ष्म उद्योगाला चालना मिळाली. असे असतानाही त्यांच्या कामावर नाखुष असल्याचा अपप्रचार सध्या सुरु आहे. आज कोट्यवधींची उलाढाल या पतसंस्थेची आहे. पतसंस्थेची उन्नती साधतांना अनेक परिवर्तन त्यांना करावे लागले. परिवर्तनवादी धोरणामुळेच आज ही पतसंस्था यशाच्या शिखरावर पोहचली आहे. हे नव्याने सांगण्यासारखं नाहीत. आपल्या सर्वांच्या सहकार्याने पतसंस्थेचे सभासद, खातेदार व ठेवीही निरंतर वाढत आहे.
तूर्तास नियोजनाची, कामाची व प्रामाणिकपणाची जाणीव मतदार ठेवतीलच असा सहकार ला विश्वास आहे. म्हणून येत्या 26 जूनला आपण मतदार बांधवानी "छत्री" ला साथ द्यायची आहे.
अॅड देविदास काळे समर्थित जय सहकार पॅनल चे उमेदवार :
मांडवकर विवेकानंद आबाराव, दामले सुधीर जनार्दन, पांडे हरीशंकर मन्साराम, अंडेलवार लिंगारेड्डी मल्लारेड्डी, ठाकरे अरविंद वसंतराव, एकरे परीक्षित अरुणराव, आगलावे चिंतामण पांडुरंग, पिंपळशेंडे गोपाळराव रघुनाथ, बद्दमवार पुरुषोत्तम हनुमंतू, निखाडे घनश्याम वासुदेवराव, देठे सुनिल देवराव, ठाकुरवार सौ. छाया अशोक, जिवने सौ. निमाताई सुनील, भोंगळे रमेश केशवराव, बरडे सुरेश तानबाजी व रायपुरे उदय सदाशिव हे आहेत. 
पतसंस्थेच्या प्रगतीमुळे अनेकांच्या लघु, सूक्ष्म उद्योगाला चालना मिळाली - अॅड देविदास काळे पतसंस्थेच्या प्रगतीमुळे अनेकांच्या लघु, सूक्ष्म उद्योगाला चालना मिळाली - अॅड देविदास काळे Reviewed by सह्याद्री चौफेर on June 22, 2022 Rating: 5
Powered by Blogger.