सह्याद्री | चौफेर न्यूज
झरी : तालुक्यात २० सहकारी सोसायट्या असून कोरोना मुळे सोसायटीच्या निवडणूक प्रकिया रखडली होती. परंतु यावर्षी सर्वच सोसायटीच्या निवडणूका होत आहे. काही सोसायटी च्या निवडणूकाचे निकाल लागले असून यामध्ये बहुतांश सोसायटी वर काँग्रेसची सरशी होतांना दिसत आहे.
२० एप्रिल २०२२ रोजी झरी सोसायटीची निवडणूक पार पडली. काँग्रेस नेते वामनरावजी कासावार, राजीव येल्टीवार यांचा मार्गदर्शनाखाली वणी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल यांच्या नेतृत्वाखाली झरी सोसायटी वर काँग्रेस ने दणदणीत विजय प्राप्त केला. त्यामुळे कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निवडणुकीत दिवाकर पुसाम, किसन कुळमेथे, नंदकिशोर किनाके, श्रीनिवास धांडेकर, विलास नागरतवार, लुकेश शिरपूरकर, मनोहर कुमरे, नानाजी जुमनाके, तुकाराम कोरांगे, देविदास मारस्कोले, सिंधुबाई शेडमाके, विनाबाई कुळमेथे हे विजयी झाले आहे तर,पांडुरंग खडसे हे बिनविरोध निवडून आले आहे.
एकूण १३ सदस्य हे सर्व एकाच पॅनल चे आहेत.
काँग्रेसचा दणदणीत विजय, १३ सदस्य आले निवडून
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 21, 2022
Rating:
