कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
सविस्तर असे की, वणी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा सावर्ला येथील अजय अनिल तामगाडगे (१८) इयत्ता १२ वी पास होता, पुढे बि ए (BA1st) प्रथम वर्षांकरिता प्रवेश घेणार दरम्यान, ७ सप्टेंबर २०२१ रोजी अजय नेहमीप्रमाणे घरून बाहेर पडला. मात्र, तेव्हापासून तो घरी परतलाच नाही. याबाबत ८ सप्टेंबर २०२१ रोजी वणी पोलीस ठाण्यात अजय बेपत्ता असल्याची तक्रारी त्याच्या आईने दाखल केली. तेव्हा पासून पोलीस त्या बेपत्ता मुलाच्या शोधात आहे. परंतु गेली सात महिने लोटूनही पोलिसांना मुलाचा शोध लावण्यास यश आले नाही.
परिणामी मुलाची आई सुमन तामगाडगे ह्या पोलीस स्टेशन च्या येर जाऱ्या करीत असून माझ्या मुलाचा शोध लावा म्हणून सतत मागणी करीत आहे. परंतु सात महिने लोटूनही पोलिसांना बेपत्ता मुलाचा शोध लावण्यास यश येत नसल्याने मुलाच्या न्यायासाठी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला असून, येत्या १ मे महाराष्ट्र दिनापासून वणी पोलीस स्टेशन समोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा आज (ता.२५) एप्रिल रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी वणी, उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार पोलीस स्टेशन यांना निवेदन देऊन यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आहे.
सात महिने उलटूनही मुलाचा शोध लागत नसल्याने १ मे महाराष्ट्र दिनापासून "त्या" मातेचे उपोषण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 23, 2022
Rating:
