फिस्कीच्या जंगलात वाहतुकीची होते कोंडी, प्रवाशी त्रस्त

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मारेगाव : तालुक्यातील मार्डी वणी जाणारा रस्त्यालगत असलेले फिस्की जंगल हे सध्या वाहतूक कोंडीचे कारण ठरत असून संबंधित मार्गाने जायचे असल्यास फिस्की जंगलात असलेला अरुंद रस्ता सर्वांसाठी डोकेदुखी चे कारण बनलेला आहे.

या मार्गाने जड वाहुतक म्हणून सिमेंट, कोळसा, रेतीचे ट्रक जास्त प्रमाणात वर्दळ सुरू असते शिवाय महत्वाचे म्हणजे सदर रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. वनविभागाकडून रस्त्याची परवानगी न मिळाल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे जड वाहनांना क्रॉस करण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत असून ह्या अरुंद रस्त्यामुळे वाहन रस्त्याच्या कडेला उतरून तर, कधी कडेला फसून रस्ता जाम होतो,त्यामुळे या मार्गाने दैनंदिन खासगी व शासकीय येरजाऱ्या करणाऱ्यांना या ठिकाणी होत असलेली वाहतूक कोंडीमुळे हा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी प्रवाशांना कित्येकदा तासंतास येथील वाहतूक कोंडीने कामावर, घरी वेळेवर पोहचणे शक्य होत नाही ताटकळत बसाव लागत आहे. असे सामाजिक कार्यकर्ते धनंजय आसूटकर यांनी सांगितले.
फिस्कीच्या जंगलात वाहतुकीची होते कोंडी, प्रवाशी त्रस्त फिस्कीच्या जंगलात वाहतुकीची होते कोंडी, प्रवाशी त्रस्त Reviewed by सह्याद्री चौफेर on March 24, 2022 Rating: 5
Powered by Blogger.