टँकर पलटून चालक जागीच ठार

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यातील बेंबळा कालव्याची कामे  परिसरात अतोनात सुरू आहे. येथील कामांना विविध साहित्यासह पाणी पुरवठा करण्याकरिता जात असलेला टँकर नाल्यात कोसळला. या घटनेत चालकाचा जागीच मृत्यू झाला असल्याचे वृत्त असून सदर घटना आज (ता.२४ मार्च) रोजी २ वाजता च्या दरम्यान घडली.

शिवदास जयसिंग राठोड (६४ वर्ष) रा. करजी असे मृतक चालकाचे नाव आहे. तालुक्यातील बेंबळा (प्रकल्प) कालवाच्या कामाला पाणी टँकरद्वारे पुरविण्यात येतेय. अशातच आज पाणी भरलेला टँकर घेऊन जात असतांना अचानक नाल्यात कोसळून पलटी झाला असून यामध्ये चालक जागीच ठार झाला असल्याचे समजते.
दरम्यान,पोलीस येण्यापूर्वीच टँकर जैसे थे करून ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सावंत करित आहे.


टँकर पलटून चालक जागीच ठार टँकर पलटून चालक जागीच ठार Reviewed by सह्याद्री चौफेर on March 24, 2022 Rating: 5
Powered by Blogger.