टॉप बातम्या

देवानंद येरमे यांचे दीर्घआजाराने निधन


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मारेगाव : येथील देवानंद येरमे यांचे काल रात्री  दीर्घआजाराने दुःखद निधन झाले.
मृत्यू समयी त्यांचे ४० वर्षाचे वय होते. ते विदर्भात  उत्कृष्ट तबला वादक म्हणून सुपरिचित होते, काल अचानक त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांना चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान काल रात्री साडे नऊ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या निधनाची वार्ता परिसरात पसरताच सांगितप्रेमी, गुरुदेव प्रेमी व त्यांच्या चाहत्यात शोककळा पसरली.
त्यांच्या पश्चात आई, लहान भाऊ, भाव सून, पत्नी, व एक मुलगा असा आप्त परिवार आहे.

मारेगाव मोक्षधाम येथे चार वाजता त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
Previous Post Next Post