चंद्रपूर जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांनी पकडलेल्या अवैध गाैण खनिज वाहनाला झाला तीन लाखांपेक्षा अधिक दंड, तर पडाेलीचे मंडळ अधिकारी विनाेद गनफाडेंनी जप्त केले पदमापूर मार्गावर अवैध रेतीचे वाहन !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : जिल्हाभर महसुल व खनिकर्म पथकांची अवैध गाैण खनिज वाहने पकडण्यांची माेहीम जाेरात असुन अश्यातच चंद्रपूर जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम हे जिल्हा दाै-यावर असतांना त्यांनी दि.३१ जानेवारीला रात्री आठ वाजता मूल रेल्वे गेट जवळ गिट्टीची अवैध वाहतुक करणा-या एका वाहनास पकडले व लगेच त्यांनी ते वाहन जप्त करुन तहसील कार्यालयात जमा केले. सदरहु वाहन मूल तालुक्यातील डाेंगरगांव निवासी पुरुषोत्तम वासुदेव वासेकर यांच्या मालकीचे असल्याचे बाेलल्या जाते. उपराेक्त अवैध गाैण खनिज वाहन जप्तीनाम्यावर नांदगांवचे तलाठी बि.डी.मेश्राम यांची स्वाक्षरी असुन ते वाहन दिनेश भिमराव पुजारी यांचेकडे सुपुर्द नाम्यावर देण्यांत आले हाेते.दरम्यान या वाहनावर दंडात्मक कारवाईपाेटी तीन लाख सातशे पन्नास रुपये दंड आकारण्यांत आला असल्याचे विश्वासनिय सुत्राने आज सांगितले.

चंद्रपूर तालुक्यातील पडाेलीचे मंडळ अधिकारी विनाेद गनफाडे व माेरवा साजाचे तलाठी अन्वर शेख यांनी दि.४ फेब्रुवारीला सकाळी नव वाजता एम एच- ३५ ऐ जी - १२११ या क्रमांकाचे अवैध रेतीचे ट्रॅक्टर पदमापूर मार्गावर पकडले. सदरहु वाहनाचा जप्ती नामा करुन ते वाहन दंडात्मक कारवाईसाठी लगेच चंद्रपूर तहसील कार्यालयात जमा केल्याचे वृत्त आहे. जप्तीतील वाहन सुरज गेडाम यांचे मालकीचे असल्याचे समजते. या पूर्वी सुध्दा मंडळ अधिकारी गनफाडे व पटवारी शेख यांनी जिव धाेक्यात घालून अवैध गाैण खनिजांची वाहने पकडल्याचे सर्वश्रूतच आहे. महसुल पथक व खनिकर्म पथकांच्या सततच्या कारवायांमुळे जिल्ह्यातील रेती तस्करांत धडकी भरल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते.हे मात्र तेवढेच खरे आहे.

जिल्ह्यातील बल्हारपूर तालुक्यात देखिल महसुल पथकाने एका अवैध गाैण खनिज वाहनावर नुकतीच कारवाई केल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे.
Previous Post Next Post