महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मंगलाताई ठक यांच्या उपस्थितीत नेवासा येथे होमगार्ड कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
सह्याद्री न्यूज नेटवर्क |
नेवासा : नेवासा येथे होमगार्ड कार्यालयात ७३ व्वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी होमगार्ड कार्यालयाचे ध्वजारोहण पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या हस्ते करण्यात आले
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या जेष्ठ नागरिक निराधार अत्याचार मुक्ती संघर्ष समितीच्या प्रदेश अध्यक्षा मंगलाताई ठक यांनी उपस्थिती दर्शविली, मंगला ताई या आपला संपूर्ण महाराष्ट्र भर फिरून दौरा करीत असल्याचे सांगितले.
या वेळी शिर्डी येथे बैठक घेतली व काही महत्वाच्या महाराष्ट्र व अहमनगर जिल्ह्याचा नियुक्त्या केल्या व कोपरगाव येथे स्वामी निराधार संघटनेचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर कडू पाटील, संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षा मंगल देशमुख,जनसंपर्क प्रमुख सुधीर चव्हाण, नगरसेवक राजेंद्र मापारी, बाळासाहेब केदारे, शरणपूर वृद्ध आश्रमाचे रावसाहेब मगर, उद्योजक उदरें पाटील, राजेंद्र कडू, पोलीस मित्र नळघे, पलटनायक दिलीप गायकवाड, अशोक टेमकर, अंश कालीन लिपिक अल्ताफ शेख,माजी होमगार्ड हमीद शेख, होमगार्ड संतोष गायकवाड, अमोल मोहिते, राजेंद्र बोरुडे, यांच्या सह महिला होमगार्ड उपस्थित होत्या यावेळी सूत्रसंचालन होमगार्ड संपर्क प्रमुख सुधीर चव्हाण यांनी केले तर पत्रकार मोहन गायकवाड यांनी आभार मानले.
या प्रसंगी सर्व मान्यवरांना नेवासा येथे मंगला ताई ठक यांनी लिहिलेलं "पाठभर जखमा" एक सत्य कथन पुस्तक भेट दिले.
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मंगलाताई ठक यांच्या उपस्थितीत नेवासा येथे होमगार्ड कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 27, 2022
Rating:
