मा संजयभाऊ देरकर यांना यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - शुभेच्छुक : विलास कालेकर

             || वाढदिवस || अभिष्टचिंतन || 

समाजात अनेक प्रकारचे लोक असतात. काही लोक केवळ बोलण्यात पटाईत असतात तर, काही लोक बोलण्यापेक्षा कृती करायला महत्व देतात. निर्झरासारखा खळखळाट करण्यापेक्षा गंगेच्या धारेसारखे निखळ वाहत रहाणं काहींचा स्वभाव असतो. आपल्या मतदार संघात विकासगंगा वहावी, हे ज्यांना मनापासून वाटतं, तेच आपल्या मतदार संघाच्या विकासकार्यासाठी सदैव झटत असतात. सार्वजनीक व लोकहिताचे प्रश्न शासन दरबारी मांडतात. नागरिकांना सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याकरिता शासन प्रशासनाशी संवाद साधतात. त्यांना येथिल समस्या अवगत करुन देतात. गावखेड्या पर्यंत विकासाची लाट पोहचावी यासाठी ते निरंतर प्रयत्न करित असतात. शहरी व ग्रामीण भागातील समस्या सोडविण्याकरिता नेहमी तत्पर राहणारे व सार्वजनीक कामांना प्राधान्य देणारे नेते म्हणून संजयभाऊ देरकर यांची वणी मतदार संघात  ख्याती आहे. शांत, संयमी, मितभाषी, कणखर, कल्पक, चरित्र्यसंपन्न व सर्वांना समान समजणारं व्यक्तिमत्व म्हणून संजयभाऊ देरकर यांना ओळखलं जातं. खरयाला खरे व खोट्याला खोटे म्हणणारा स्पष्टवक्ता नेता म्हणूनही त्यांची एक वेगळी ओळख तयार झाली आहे. पक्षिय भेदभाव न करता प्रत्येक घटकाचे प्रश्न सोडविणारया व सहकार क्षेत्र विस्तारीत करुन रोजगार उपलब्धीला चालना देणारया या लोकसेवकाने लोकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. 

आपल्या अजोड कर्तुत्वामुळे कर्तुत्ववाण व्यक्तिमत्व म्हणून ख्याती मिळालेल्या या असामान्य नेतृत्वाचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छा!

शुभेच्छुक : विलास कालेकर, विरकुंड 
मा संजयभाऊ देरकर यांना यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - शुभेच्छुक : विलास कालेकर मा संजयभाऊ देरकर यांना यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - शुभेच्छुक : विलास कालेकर Reviewed by सह्याद्री चौफेर on January 17, 2022 Rating: 5
Powered by Blogger.