सह्याद्री | किरण घाटे
चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे आदिवासी समाज संस्कृती साहित्य इतिहास ह्या विषयावर दोन दिवस राष्ट्रीय परिसंवाद जनाधिकार मंच, आदिवासी एकता युवा परिषद, नारायण सिंह ऊईके विकास समिती ब्रम्हपूरी यांचे संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या पुढाकाराने आयोजित केला होता.गडचिरोली जिल्ह्याचे शिल्पकार कै. बाबुरावजी मडावी यांच्या दृष्टीकोनातून या जिल्ह्याचा विकास कसा होता व पुढे या परिसराची विकासाच्या दृष्टीने वाटचाल कशी असावी यावर चिंतन करण्यात आले. गडचिरोली हे देशाचे विकास माँडेल बनावे,
आर्थिक, सामाजिक प्रश्नांना घेऊन आपली विकासात्मक वाटचाल करावी. शिक्षणाची गंगोत्री व्हावी,व देशभरातून अभ्यासक, संशोधक येथे येवून अभ्यास करावे. हे त्यांचे स्वप्न होते. गोंडवाना विद्यापीठाच्या पुढाकाराने त्यांच्या स्वप्नातील आदिवासी विकासाची पूर्तता होईल असे वक्तव्य कुलगुरू डॉ.श्रीनिवास वरखेडी यांनी व्यक्त केले. सदरहु राष्ट्रीय परिसंवादासाठी विद्यापीठाच्या इतिहास विभागाने अथक परिश्रम घेतले.
डॉ .रश्मी बंड, डॉ. नरेश मडावी, डॉ .संतोष सुरडकर यांचा मोलाचा वाटा आहे. कुसुम ताई अलाम यांच्या रान आसवांचे तळे, रान पाखरांची माय, रान जखमांचे गोंदण या तीनही कविता संग्रहावर प्रमोद बोरसरे यांनी विवेचन केले.
गडचिराेलीत दाेन दिवशीय राष्ट्रीय परिसंवाद संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 29, 2021
Rating:
