महाराष्ट्रातील आमदारांनी घेतली काँग्रेसचे दिग्गज नेते नरेशबाबू पुगलिया यांची सदिच्छा भेट


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (१३ आक्टों.) : महाराष्ट्रातील विधानसभा व विधानपरिषदचे सदस्य चंद्रपूर मध्ये विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आले असताना काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या चंद्रपूर निवासस्थानी जाऊन त्यांची आज सदिच्छा भेट घेतली.

यावेळी काँग्रेसचे युवा नेता राहुल पुगलिया यांनी आमदार रणजितजी कांबळे, आमदार झनक, आमदार नाईक, आमदार मिरजा बेग, आमदार दूष्यांत चतुर्वेदी यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे (ग्रामीण) अध्यक्ष गजाननराव गावंडे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक देवेंद्र बेले, नगरसेवक अशोक नागपुरे आदीं प्रामुख्याने या प्रसंगी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील आमदारांनी घेतली काँग्रेसचे दिग्गज नेते नरेशबाबू पुगलिया यांची सदिच्छा भेट महाराष्ट्रातील आमदारांनी घेतली काँग्रेसचे दिग्गज नेते नरेशबाबू पुगलिया यांची सदिच्छा भेट Reviewed by सह्याद्री चौफेर on October 13, 2021 Rating: 5
Powered by Blogger.