गणेश अनमूलवार यांची अध्यक्ष पदी उपाध्यक्षपदी युनूस शेख यांची निवड

तालुका प्रेस क्लबची कार्यकारिणी गठी
सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (११ ऑक्टो.) : रविवार १० ऑक्टो. २०२१ रोजी तालुका प्रेस क्लबची नविन कार्यकारिणी करीता बैठकीचे आयोजन स्थानिक पांढरकवडा विश्रामगृह येथे करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नरेशभाऊ मानकर उपस्थित होते. यावेळी सर्वानुमते तालुका प्रेस क्लबची कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली.

यामध्ये अध्यक्षपदी गणेश अनमुलवार, कार्यअध्यक्षपदी विशाल मग्गीडवार, उपाध्यक्षपदी युनुस शेख, सचिवपदी रवि वल्लमवार, सहसचिवपदी सूरज बंडीवार, कोषाध्यक्षपदी आतिक शेख, सहकोषाध्यक्षपदी निखिल बेले, जेष्ठ सल्लागार, नरेश मानकर, प्रा.मंगेश होटे, अरुण डोगंशनवार, आशिष बडवे, अश्फाक खान, प्रवीण पिन्नमवार, सदस्य नितीन बारहाते, बाळा सस्ते, मनोज मोतेकार, विराग नेमनवार, नितीन कर्णेवार, यांची निवड करण्यात आली आहे.

तालुका प्रेस क्लब तालुक्यातील ग्रामीण व शहरी विभागाच्या विविध समस्येला वाचा फोडण्यात सदैव अग्रेसर राहत असून, सोबत विविध सामाजिक सेवाकार्य राबविण्याबाबत यावेळी संकल्पना केली आहे.
गणेश अनमूलवार यांची अध्यक्ष पदी उपाध्यक्षपदी युनूस शेख यांची निवड गणेश अनमूलवार यांची अध्यक्ष पदी उपाध्यक्षपदी युनूस शेख यांची निवड Reviewed by सह्याद्री चौफेर on October 11, 2021 Rating: 5
Powered by Blogger.