सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (०१ सप्टें.) : महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंची सहसंयाेजिका कु.सायली मारुती टाेपकर (दुधारी ) हिला मेजर ध्यानचंद केंद्रीय परिषद नवी दिल्ली राष्ट्रीय क्रीडा अधिवेशनात सुवर्णलक्ष्य क्रीडा पुरस्कार देवून नुकतेच गाैरविण्यांत आले आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा सांगली जिल्ह्यातील मिरज बालगंधर्व नाटयगृह येथे पार पडला.
आयोजित या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, दिग्वीजय सुर्यवंशी, संजय बजाज व राहूल पवार उपस्थित हाेते. आपणास वेळाेवेळी आपले मार्गदर्शक प्रशिक्षक आर.एस.पी. पोलिस साहिल तापेकरी यांचे तसेच मामा ज्ञानेश कुशवंत माने, अनिल शंकर कदम, राजाराम बापू दुध संघाचे चेअरमन विनायक अण्णा पाटील, ताकारीचे सरपंच अर्जुन पाटील, वाळवा पंचायत समितीच्या सदस्या रूपालीताई सपाटे या शिवाय दुधारी ग्रामपंचायतच्या सरपंच अर्चना पोळ,उपसरपंच दिपक लकेसर व ग्रामसेवक अमर वाटेगावकर यांचे सहकार्य लाभले असल्याचे कु.सायली टाेपकरने या प्रतिनिधीशी बाेलतांना आज सांगितले. कु.सायली ही कुशवंत अण्णा माने यांची नात असून ती त्यांचे कडे राहुनच आपले अभियांत्रिक शिक्षण पूर्ण करीत आहे. क्रीडा पटु सायलीने या पूर्वी देखिल अनेक पुरस्कार प्राप्त केले आहे.
दरम्यान सहज सुचलंच्या मार्गदर्शिका अधिवक्ता मेघा धाेटे, याेगशिक्षिका मायाताई काेसरे, सिमा पाटील, प्रभा अगडे, अल्का सदावर्ते, सुविद्या बांबाेडे, मंथना नन्नावरे, कविता चाफले, पायल आमटे, रसिका ढाेणे, श्रुति कांबळे, पुनम रामटेके, सराेज हिवरे, प्रतिभा चट्टे आदींनी सायलीचे अभिनंदन केले आहे.