मूलच्या सुपरिचित कवयित्री प्रतिमा नंदेश्वर यांच्या 'बहिणाबाई' काव्यसंग्रहाचे उपराजधानी नागपूरात थाटात प्रकाशन ; अनेक मान्यवरांची उपस्थिती

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (०२ सप्टें.) : वैदर्भीय मातीशी साहित्याची नाळ जोडून असलेल्या मूल येथील प्रसिद्ध कवयित्री प्रतिमा नंदेश्वर यांच्या 'बहिणाबाई' या तिस-या कविता संग्रहाचे लोकार्पण 'मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह नागपूर येथे उत्साहात संपन्न झाले. त्यांना यावर्षीचा 'साहित्य सेवा सन्मान' पुरस्कार देऊन संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी सन्मानित केले.

नंदेश्वर यांचे यापूर्वी 'अर्पण', 'भरारी' हे दोन कविता संग्रह प्रकाशित असून त्यांच्या भरारी कविता संग्रहास थायलंड येथील संमेलनात पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांचे तीनही कविता संग्रह हे नवोदित कवी साहित्यिकांना प्रेरणा व मार्गदर्शन करणारे असून, बहिणाबाई हा काव्यसंग्रह त्यांनी त्याच्या आईस समर्पित केला आहे.

नुकतेच मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर आयोजित काव्यसंग्रह प्रकाशन समारंभात १८ पुस्तकांचे प्रकाशन अध्यक्ष दादाकांत धनविजय,प्रमुख मार्गदर्शक डॉ.अनिल पावशेकर व प्रा.आनंद मांजरखेडे तसेच अतिथी मा.मयुर निमजे, डॉ .सोहन चवरे, पत्रकार कु.रेणुका किन्हेकर या सर्व मान्यवरांच्या हस्ते 'बहिणाबाई' काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

याप्रसंगी राज्यातील ३० कवी कवयित्रींना "साहित्य सेवा सन्मान पुरस्कार २०२१" देऊन सन्मानित करण्यात आले. समारभांचे संचालन राहुल पाटील यांनी केले तर आभार प्राजक्ता खांडेकर यांनी मानले.