सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
स्मशान मी म्हटलं की अंगावरचा काटा उभा होतो. जळणारी चिता, आक्रोश करणारे नातेवाईक,आणि खिन्न उदास मनाने गोळा झालेले लोकं व इतर दिवस पसरलेली अती शांतता असलेले ठिकाण. रात्रीच्या वेळी या ठिकाणी कोणी फारसं जात नाही. किंबहुना असल्या ठिकाणी जायची फाटते म्हणायला हरकत नाही. परंतु अशा या ठिकाणी जीवनाचा अंतिम प्रवास तेथेच संपतो.
अनेक गोतावळा आपल्याला शेवटचा निरोप द्यायला गोळा होतात. परंतु उन्हाळ्यात सावली अभाव तर पावळ्यात दुर्गंधी, काटेरी झुडपे, आडमाप वाढलेले तरोटा, गांजर गवत यांनी पाय द्यायलाही जागा नसते. अशी स्थिती अनेक गावातील स्मशान भूमीची असते, काही गर्भ श्रीमंत्यांच्या गावात तर त्या ठिकाणी शासनाने दिलेल्या सुविधा ची दुरावस्था झालेली पाहायला मिळते. कसे बसे उभे राहून अंत्यसंस्कार पार पाडताना आपणास दिसते. मात्र, हे चित्र कुठे तरी बदलले पाहिजेत म्हणून मार्की (बु.) श्री. उद्धव अर्जुन मुके या सेवा निवृत्त शिक्षकाने पुढाकार घेऊन स्वच्छ आणि सुंदर स्मशानभूमी भरण्याचे काम हाती घेवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. मुके गुरुजी १९८७ पासून या गावातील आश्रम शाळेत शिक्षक म्हणून आले आणि आज गावात स्थायिक झाले. २०२१ मध्ये ते सेवा निवृत्त होऊन झाले.
त्यांच्यातला खरा शिक्षक त्यांना आजही स्वस्थ बसू देत नाही. गावातील स्मशानभूमी दुरवस्था पाहून स्मशानभूमी कशी चांगली करता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ज्ञानी, जाणकार मार्गदर्शन, दानशूर देणगी, श्रमिकांनी श्रमदान असा सगळ्याचा मेळ घालून त्यांनी काम पूर्णत्वास नेले. गावासाठी असलेल्या ४० गुंठे जागेला काटेरी तारांचे कुंपण करून त्याला गेट लावण्यात आले.
पाण्याची व्यवस्था करून जागेवर कडूनिंबाची जवळ पास ५० झाडे, करंजी २० -२५ झाडी, गुलमोहर, रस्त्याच्या दुतर्फा ला मेहंदी लावून सुशोभीकरणाचे काम केले. उन्हाळ्यात झाडांना पाणी घालू वाचून मोठी केली असून ती झाडे आता सावली देत आहे. एके काळी भकास असलेले स्मशान, त्या जागेला बागीचाचे स्वरूप आले आहे.
गेल्या तीन चार वर्षात कोजागिरी उत्सव ह्या ठिकाणी साजरा होतो. निवृत्तीनंतर बहुतेक जण स्वतः पलीकडे विचार करत नाही. परंतु मुके गुरुजी आपला वेळ देवून गावातील चांगल्या शक्तीला एकत्र करून चांगले कार्य केले. चांगल्या शिक्षकाच्या कार्याची जाणी सर्वाना व्हावी ही 'शिक्षक दिनानिमित्त' अपेक्षा आहे.
शिक्षक दिन विशेष!!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 04, 2021
Rating:
