सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (३०सप्टें.) : चंद्रपूर ते अदिलाबाद या मार्गावर काल झालेल्या एका अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली. तर याच घटनेत अन्य तिन जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त
आहे. गडचांदूर नजिकची ही घटना असुन दाेन दुचाकीत हा अपघात घडला असुन यात रमाकांत उरकुडे यांची घटनास्थळीच प्राणज्याेत मालवली. रस्त्यावरील अताेनात पडलेल्या खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याचे बाेलल्या जाते. याच मार्गावर रस्त्याच्या दुर्दशामुळे अनेकांचे या पूर्वी (अपघातात) प्राण गेले आहे.
रस्त्यावरुन वाहने चालवितांना चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. पण प्रशासन मात्र, या कडे लक्ष पुरवित नसल्याची खंत अनेकांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बाेलुन दाखविली आहे.
रस्ता अपघातात एक ठार तर तिघे जखमी - चंद्रपूर अदिलाबाद मार्गावरील घटना !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 30, 2021
Rating:
