सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव, (१९ ऑगस्ट) : दिनांक १८/०८/२०२१ पांढरकवडा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधिश पी.बी. नाईकवाड यांनी समक्ष पो. स्टे. मारेगाव येथील अप.फ. १९३/२०१८ या प्रकरणात सत्र न्यायालयात न्यायप्रविष्ट विशेष पोक्सो प्रकरण क्र. १९/२०१८ या खटल्यातील आरोपी अनुराव वसंता आत्राम वय २३ वर्षे रा. गोदामपोड बोटोनी ता. मारेगांव जि. यवतमाळ यास ५ वर्ष सश्रम कारावास व रू. १०,०००/- दंड न भरल्यास १० महिन्याचा अतिरिक्त कारावास अशी शिक्षा बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदाचे कलम ८ अन्वये, रोजी ठोठावण्यात आली.
या प्रकरणातील हकीकत अशी की, दि. १५/०७/२०१८ रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान पिडीत तिच्या घराच्या अंगणात मौजा. गोदामपोड ता. मारेगांव येथे खेळत असतांना तिचा काका आरोपी नामे अनुराव वसंता आत्राम याने तिला खरा आणण्याच्या बहान्याने घरी बोलावले व पलंगावर झोपवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यावरून पो.स्टे. मारेगांव येथे पिडीतेच्या आईने दिलेल्या रिपोर्टवरून आरोपी विरूध्द भा.दं.वि. चे कलम ३७६ (२) (१) (अ) (ब), ३७७ सहकलम ४, ६ पोक्सो अन्वये अपराध क्रमांक १६३/२०१८ गुन्हयाची नोंद करून प्रकरण वि. न्यायालय पांढरकवडा येथे करण्यात आले. प्रस्तुत प्रकरणात अभियोजन पक्षाने एकुण १० साक्षदार तपासले. साक्षदारांच्या सबळ पुराव्यावरून न्यायालयाने आरोपीला ५ वर्ष सश्रम कारावास व रू. १०,०००/- दंड न भरल्यास १० महिन्याचा अतिरिक्त कारावास अशी शिक्षा बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदाचे कलम अन्वये, आज दि. १८/०८/२०२१ रोजी ठोठावण्यात आली आहे. प्रस्तुत प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक वडगांवकर यांनी तपास केला व पैरवी अधिकारी म्हणुन सहायक फौजदार अन्सार शेख यांनी काम पाहिले. अभियोजन पक्षातर्फे सहायक सरकारी ऍड प्रशांत मानकर यांनी बाजू मांडली व अभियोजन पक्षाचा युक्तीवाद ग्राहय धरण्यात आला.
बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस ५ वर्ष सश्रम कारावास व दहा हजार दंडाची शिक्षा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 19, 2021
Rating:
