सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२५ ऑगस्ट) : आदिवासी बांधवाचेच नव्हे तर सर्व भारतीय समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या जननायक बिरसा मुंडा यांच्या पुर्णकृती पुतळ्याच्या पुनर्स्थापन करिता गेल्या ५ मार्च पासून बैठा सत्याग्रह येथील स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालया समाेर सुरु आहे. परंतु महानगर प्रशासन व जिल्हा प्रशासन यांच्या उदासीन उदाधाेरणामुळे व राजकीय हस्तक्षेपांमुळे जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मारकाकडे मुद्दाम डाेळेझाक हाेत आहे. तदवतंच आदिवासी बांधवाचा आवाज दाबण्यांचा आटाेकाट प्रयत्न व्यवस्थेकडुन सुरु आहे.
जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्णपणे पार पडली असतांना सुध्दा बिरसा मुंडा पुतळ्याचे काम थंड बस्त्यात आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराच्या विराेधात येत्या ३० ऑगस्ट चंद्रपूरातील जेल परिसरातील शहिद विर बाबूराव शेडमाके यांचे स्मारका जवळुन सकाळी १०:३० वाजता एका भव्य आक्राेश माेर्चाचे आयोजन करण्यांत आले आहे. हा माेर्चा आदिवासी बांधव व काही सामाजिक संघटनेच्या वतीने निघत आहे.