माजी नगराध्यक्ष सतीशबाबू तोटावार काळाच्या पडद्या आड

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
वणी, (२७ ऑगस्ट) : वणी नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष सतिश तोटावार यांचे आज दि.२७ ऑगस्टला सकाळी ८:३० वाजता दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या दुःखद निधनावर सामाजिक, राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.

मनमिळावु स्वभाव, जिजाजी अशी ओळख असेलेले व  प्रसिद्ध कोळसा व्यावसायिक सतिशबाबू तोटावार यांना दि.२२ ऑगस्टला अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना नागपुर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्यांच्या हृदयावर  शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. मात्र, त्यांना ब्रेन हॅमरेज चा झटका आल्याने त्यांना नागपुर येथील न्यु ईरा हॉस्पिटल मध्ये भर्ती करण्यात आले होते. १९९७-९७ या काळात त्यांनी वणी नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद भूषवले होते.

गेल्या सहा दिवसापासुन त्यांचेवर उपचार सुरू होते. मात्र,आज सकाळी ८:३० वाजताचे सुमारास त्यांची  प्राणज्योत मालवली. सतिषबाबू यांचे दुःखद निधन झाल्याची वार्ता शहरात पसरताच त्यांच्या चाहत्या वर्गासह परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे पार्थिववार वणी येथील मोक्षधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
माजी नगराध्यक्ष सतीशबाबू तोटावार काळाच्या पडद्या आड माजी नगराध्यक्ष सतीशबाबू तोटावार काळाच्या पडद्या आड Reviewed by सह्याद्री चौफेर on August 27, 2021 Rating: 5
Powered by Blogger.