टॉप बातम्या

एसीबीच्या जाळ्यात पांढरकवडा उत्पादन शुल्क चा कर्मचारी


सह्याद्री न्यूज | रवी वल्लमवार 
केळापूर, (२६ ऑगस्ट) : मारेगाव तालुक्यातील एका दारू विक्रेत्याकडून १२०००/_ रुपयांची लाच स्वीकारत असतांना येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सहाय्यक दुय्यम निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. बुधवारी सायंकाळी ६:३० वाजता ही घटना घडली. शंकर गोविंदा घाटे असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे.

शंकर गोविंदा घाटे यांनी तक्रारकर्त्याला विदेशी मद्य परवाण्यावर कारवाई न करण्यासाठी ६०००/_रुपये तसेच राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या निरीक्षकासाठी मासिक हप्ता म्हणून ६०००/_ रुपये अशा एकूण १२०००/_ रुपयाच्या लाचेची मागणी केली. शंकर घाटे यांनी १२०००/_ लाच स्वीकारताना अधिकारी कर्मचाऱ्यांची त्याच्यावर झडप घालून त्याला अटक केली.

त्याला येथील विश्रामगृहात नेण्यात आले, ही कारवाई अमरावती येथील एसीबीचे पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या निदर्शनात करण्यात आली.
Previous Post Next Post