सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
उमरखेड, (२० ऑगस्ट) : उमरखेड महागाव विधान सभेचे आमदार नामदेवराव ससाने यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या उमरखेड तालुक्यातील दराटी (शिवाजीनगर तांडा), कृष्णापुर या गावातील घरांची पाहणी केली व नुकसानग्रस्त कुटुंबीयांना भेट देऊन दिलासा दिल.
शासन स्तरावरून तात्काळ पंचनामे करून मदत करण्याबाबत तसेच पूरग्रस्तांना राशन उपलब्द करून देण्याबाबत आनंद देऊळगावकर तहसीलदार उमरखेड यांना सूचना केल्या. यावेळी माजी आ.राजेंद्र नजरधने, आनंद देऊळगावकर तहसीलदार उमरखेड, ए पी आय पांडव, तलाठी, कृषी विभाग, रामकृष्ण पाटील, राम शेळके, केशव वायकोळे, दत्ता जंगले, अर्जुन बडेवाड, डॉ. उद्दल जाधव, अशोक नाईक, विजय राठोड, दिलीप नाईक, पंजाब जाधव, अंकुश राठोड, बबन जाधव, राजू तिळेवाड, जालिंदर सुरमवाड, विकू पाटील विष्णू बाभळे, रणजित पाटील, काशीराम पाटील, उमाजी पो. पाटील, बालू भोयर, विष्णू जाधव तथा अतिवृष्टी बाधित गावकरी उपस्थित होते.
अतिवृष्टीने पाण्याखाली गेलेल्या दराटीला आ. ससाने यांनी दिली भेट
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 20, 2021
Rating:
