सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
केळापूर, (१५ ऑगस्ट) : लोकशाही व्यवस्थेतील ग्रामपंचायत हे पहिले सभागृह आहे. पंचायत राजमध्ये ग्रामसभा व ग्रामपंचायत केंद्रबिंदू मानला जातो. मात्र आजही केळापूर तालुक्यामध्ये १३ गावामध्ये स्वतंत्र ग्रामपंचायत कार्यालय किंवा सुसज्ज अशी इमारत उपलब्ध नाही. तालुक्यातील ७४ गावांपैकी जवळपास १३ ग्रामपंचायतीकडे कार्यालयसाठी स्वतःची इमारत नाही. जिल्हा परिषद डीपीडीसी विकास योजना जनसुविधा अंतर्गत तसेच विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामपंचायत इमारतीसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. तरीही अशा योजनेतून केळापूर तालुक्यातील १३ ग्रामपंचायती आतापर्यंत वंचित राहिल्या आहेत. यामध्ये वारा, कवठा, सिंगलदीप, वाई, कोपामांडवी, पिंपरी (बोरी)वाघोली, घोन्सी, कुंडी, मारेगाव (वन) मांगुर्डा, खैरगाव (बु.) या गावाचा समावेश आहे.
येथे ग्रामपंचायत कार्यालयातील स्वतंत्र इमारत नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत, गावाच्या विकासावरही याचा परिणाम झाला आहे. नवीन धोरणानुसार आता विकास निधी, हा थेट ग्रामपंचायतीला मिळत असल्याने सरपंच पदासाठी अनेक कामांमध्ये स्पर्धा पहायला मिळते. ग्रामपंचायत कार्यालय स्वतःच्या हक्काच्या इमारतीत होणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत कार्यालयात हे विविध योजनेतून तसेच आमदार,खासदार निधीतून बांधता येते मात्र, इच्छाशक्ती नसल्याने १३ गावातील ग्रामपंचायती कार्यालयाविना दिसुन पडत आहे. केळापूर तालुक्यातील गाव पातळीवर अनेक ठिकाणी महिला सरपंच आहेत, यांचीही कुचंबना होत आहे.
केळापूर तालुक्यातील 13 गावामध्ये ग्रामपंचायतीला नाही इमारतच
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 15, 2021
Rating:
