सह्याद्री न्यूज | दिलदार शेख
मारेगाव (२३ जुलै) : जगावर कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. आणि अशा काळात रुग्णांना रक्ताची गरज भासत असते. या कठीण काळाचे महत्व लक्षात घेऊन साई मित्र परिवारातर्फे या वर्षी रक्तदान शिबीराचे आज रोजी आयोजन केले आहे होते. या शिबिराला चांगला प्रतिसाद दिल्याने आयोजकांच्या वतीने रक्तदात्यांचे आभार मानले आहे. या शिबिरात १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले असे साई मित्र परिवाराच्या वतीने सांगण्यात आले.
'रक्तदान हेच श्रेष्ठदान' हे सर्व लक्षात घेऊन गेल्या ९ वर्षापासून मारेगाव साई मित्र परिवारातर्फे 'गुरुपौर्णिमा उत्सव' साजरा केला जातो.
या दिनाचे औचित्य साधून यावर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन जगन्नाथ महाराज मंदिर (राष्ट्रीय शाळा) येथे करण्यात आले आहे होते. त्याच सोबत ग्रामीण रुग्णालयात फळे वाटपाचा ही कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी 'महाप्रसाद' चा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता.
गुरु पौर्णिमेनिमित्त शिबिरात मोठ्या संख्येने मारेगाव तालुक्यातील रक्तदात्यांनी रक्तदान करून कठीण काळात गरज भासत असलेले रक्त तुटवडा या निमित्ताने भरून काढण्याचा छोटासा प्रयत्न साई मित्र परिवार यांच्या तर्फे करण्यात आले असून, श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रक्तपेढी, यवतमाळ यांच्याकडे १०१ युनिट रक्त संकलन करण्यात आले आहे.
साई मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 23, 2021
Rating:
