सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी, (१७ जुलै) : गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को -ऑपरेटिव्ह सोसायटी लि. नांदेड, शाखा वणी शाखेकडून आंतरराष्ट्रीय न्याय दिवसा निमित्य दिनांक १७ जुलै २०२१ रोजी वणीतील निवृत्त न्यायाधीश तसेच दिग्गज वरिष्ठ वकिलांचा सत्कार करण्यात आला.
गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी लि नांदेड आपल्या सर्व ग्राहकांना तत्पर व उत्कृष्ट सेवा देण्याकरिता नेहमीच अग्रगण्य राहिली असून, त्यासह सामाजिक बांधिलकी जपून सामाजिक क्षेत्रात सुद्धा, सामाजिक सेवा करीत मानाचा तुरा रोवत आहेच. संस्थापकीय अध्यक्ष मा. श्री हेमंत पटिल साहेब,संस्थेच्या अध्यक्षा सौ.राजश्री हेमंत पाटिल,व्यवस्थापकीय संचालक श्री.धनंजय तांबेकर यांच्या मार्गदर्शनात गोदावरी अर्बन विविध शाखे मार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात.
आज वणी शाखेकडून जागतिक न्याय दिवसानिमित्य वणीतील निवृत्त न्यायाधिश ऍड. वसंता कावडे तसेच वणीतील दिग्गज वरिष्ठ अधिवक्ता (वकील) ऍड. रजा हुसैन हैदरी सर, ऍड विनायकरावजी एकरे सर, ऍड ज्ञानेश्वरजी कातकडे सर, ऍड अमोल गौरकार यांचा सत्कार गोदावरी परिवाराकडून करण्यात आले, यावेळी वणी शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जागतिक न्याय दिनानिमित्त न्यायाधीश व वकील यांचा गोदावरी अर्बनच्या वतीने सत्कार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 17, 2021
Rating:
